

siddharth menon from dashavtar
ESAKAL
सप्टेंबर २०२५ रोजी प्रदर्शित झालेला 'दशावतार' हा चित्रपट मराठी प्रेक्षकांसाठी खास ठरला. या चित्रपटाने अनेक प्रेक्षकांची मनं जिंकली. कोकणातील प्रथा आणि परंपरांवर आधारलेल्या या चित्रपटाने कोकणी माणसाला सत्य परिस्थितीची जाणीव करून दिली. या चित्रपटात कोकणातील दशावतार हा खेळ खूप उत्तम पद्धतीने दाखवण्यात आला. लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभालावलकर यांच्या अभिनयाने सजलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. या चित्रपटातील प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. मात्र आता या चित्रपटातील माधवकडे आता एका चिमुकलीने खास गोष्टीची मागणी केली आहे. काय आहे ती गोष्ट?