

little girl dance on koligeet
sakal
सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. सध्या इन्फ्लुएन्सर्सची संख्या खूप वाढली आहे. त्यांना फॉलो करणाऱ्यांचीही संख्या खूप मोठी आहे. त्यात फक्त मोठी माणसंच नाहीत तर छोटी मुलंही व्हिडिओंमधून, ब्लॉगिंगमधून लोकप्रिय होताना दिसतायत. अशाच एका गोड मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर फिरतोय जो पाहून नेटकरी तिच्यावर फिदा झालेत. ही चिमुकली एका कोळीगीतावर डान्स करताना दिसतेय. तिच्या डान्सचं देशील प्रचंड कौतुक होतंय. विशेष म्हणजे तिच्या हावभावांवरून तर नजरच हटत नाहीये.