Ikkis Movie: नव्या वर्षाची खाकी भेट! पोलिसांनी चक्क सिनेमा हॉल बुक करून १४० मुलांना दाखवला 'ईक्कीस' चित्रपट

Lucknow Police New Year Gift: नववर्षाच्या पहिल्या दिवशी लखनौमधील मुलांसाठी पोलिसांची खास भेट
Lucknow Police officers watch ikkis movie along with school children after booking an entire cinema hall as a special New Year initiative

Lucknow Police officers watch ikkis movie along with school children after booking an entire cinema hall as a special New Year initiative

esakal

Updated on

नव्या वर्षाचा पहिला दिवस लखनौमधील शालेय मुलांसाठी अविस्मरणीय ठरला आहे. १ जानेवारी २०२६ निमित्त उत्तर प्रदेश पोलिसांनी एका अनोख्या उपक्रमाचे आयोजन करत राजभवन उच्च प्राथमिक विद्यालयातील १४० मुलांना 'ईक्कीस' हा देशभक्तीपर चित्रपट दाखवला. विशेष म्हणजे हजरतगंज पोलिसांनी मुलांसाठी संपूर्ण 'नोव्हेल्टी सिनेमा हॉल' बुक केला होता. भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित हा चित्रपट पाहून मुलांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळाला.

हा चित्रपट १९७१ च्या युद्धात पराक्रम करणाऱ्या जवानांवर आधारित असून यात जयदीप अहलावत, अगस्त्य नंदा यांनी मुख्य भूमिका निभावली आहे. सुप्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानंतर प्रदर्शित होणारा त्यांचा हा पहिला व शेवटचा सिनेमा ठरला आहे.

image-fallback
मुलाखत : सचित पाटील
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com