
'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका आज घराघरात लोकप्रिय आहे. गेली ११ वर्ष ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. या मालिकेतील अनेक पात्र बदलली. काही कलाकार सोडून गेले. मात्र मालिकेतील दया, जेठालाल, चंपकदादा, टप्पू सेना, सेक्रेटरी भिडे, माधवी भाभी, तारक मेहता, हाथी भाभी सगळेच प्रेक्षकांच्या लक्षात राहिले. यातच प्रेक्षकांच्या लक्षात राहिलेली गोकुळधाम सोसायटी मधली माधवी भाभी. मालिकेत अभिनेत्री सोनालिका जोशी पहिल्या भागापासून माधवी भाभीचे पात्र साकारत आहेत. आता सोनालिकाची एक मुलाखत सोशल मीडियावर चर्चेत आहे. यात तिने तिच्या मनातली खंत बोलून दाखवली आहे.