
'हे मन बावरे' सारख्या मालिकांमधून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री माधवी जुवेकर ही तिच्या अभिनयासाठी प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध आहे. मात्र २०१७ मध्ये तिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यात ती पैशांवर नाचताना दिसली होती. २०१७ मध्ये दस-यानिमित्त वडाळा आगारामध्ये बेस्ट कर्मचा-यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये माधवी जुवेकरसह एका कर्मचारी महिलेने आक्षेपार्ह नृत्य केले होते. यावेळी त्यांच्यावर काही कर्मचा-यांनी नोटाही उधळल्या होत्या. या घटनेचा व्हिडिओ नंतर व्हायरल झाला होता. त्यानंतर माधवीसह ७ जणांना बडतर्फ करण्यात आलं होतं. आता त्यावर माधवीने स्पष्टीकरण दिलंय.