MADHAVI NIMKAR
esakal
MARATHI ACTRESS MADHAVI NIMKAR'S TRADITIONAL HOME VIDEO GOES VIRAL: मराठी सिनेसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांना सिनेसृष्टीत सक्रीय असूनही गावाकडची ओढ कायम आहे. गावातील घर, शेती, माती, जेवण या सगळ्यांवर त्यांचं तितकंच प्रेम आहे. अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियावर त्यांच्या गावाचे व्हिडिओ शेअर करत असतात. अशातच आता एका मराठी अभिनेत्रीनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये ती शेणाने घर सारवताना पहायला मिळतेय. सध्या सोशल मीडियावर तिचा व्हिडिओ व्हायरल होतोय.