

madhuri dixit
ESAKAL
बॉलिवूडची लाडकी धक धक गर्ल माधुरी दीक्षित सध्या तिच्या 'मिसेस देशपांडे' या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. मात्र माधुरीने हिंदी चित्रपटसृष्टीतील एक काळ गाजवलाय. तिने ८०- ९० च्या काळात इंडस्ट्री गाजवलीये. तिने 'तेजाब', 'बेटा', 'खलनायक', 'दिल','साजन' अशा एकाहून एक उत्कृष्ट चित्रपटात काम केलंय. ती उत्कृष्ट नृत्यांगना देखील आहे. मात्र एका चित्रपटात तिने इंटिमेट सीन दिला होता होता. ज्यामुळे ती आजवर ट्रोल होत आलीये. त्यात ती अभिनेते विनोद खन्ना यांच्यासोबत दिसली होती. आता त्या इंटिमेट सीनवर माधुरीने प्रतिक्रिया दिलीये.