या वयात हे सगळं शोभतं का? ट्रोलिंगबद्दल स्पष्टच बोलली माधुरी दीक्षित; म्हणते, 'लोकांना बोलायला काय...'

MADHURI DIXIT TALKED ABOUT TROLLING : लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने तिला होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल भाष्य केलंय. वयानुसार शरीरात होणारे बदल लोक मान्य करत नाहीत असं ती म्हणाली.
madhuri dixit

madhuri dixit

ESAKAL

Updated on

आपल्या अभिनयाच्या जोरावर संपूर्ण बॉलिवूडला पायाशी यायला लावणारी लोकप्रिय अभिनेत्री माधुरी दीक्षित पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात सजग झालीये. तिने तिच्या अभिनय आणि नृत्याच्या जोरावर प्रेक्षकांना प्रेमात पाडलं. मात्र ज्या माधुरीच्या नृत्याचं कधीकाळी कौतुक केलं जात होतं. त्याच माधुरीच्या नृत्याला आज प्रेक्षक ट्रोल करत आहेत. तिला म्हातारी म्हणून हिणवू लागले आहेत. आता वयानुसार आपल्याही शरीरात बदल होणार, चेहरा बदलणार हे प्रेक्षकांच्या लक्षात येत नाही असं माधुरी म्हाणालीये. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत माधुरीने ट्रोलिंग बद्दल बोलत समाजाला आरसा दाखवलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com