

madhuri dixit copied namrata sambherao
esakal
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती' कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना दिसतेय. या कार्यक्रमात आतापर्यंत अनेक कलाकारांनी हजेरी लावलीये. आता या कार्यक्रमात 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ची संपूर्ण टीम येणार आहे. समीर चौघुलेंपासून ते प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, शिवाली परब, प्रियदर्शिनी इंदलकर, ईशा डे, प्रभाकर मोरे, वनिता खरात हे सगळे कलाकार या कार्यक्रमात हजेरी लावणार आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' घराघरात लोकप्रिय आहे. त्यांची एक वेगळीच क्रेझ आहे. त्यात हे सगळेच कलाकार माधुरीचे चाहते आहेत. त्यामुळे माधुरीला भेटण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.