Madhuri Dixit Video: काशीत माधुरीचा ‘शिव तांडव’ व्हायरल; पतीसोबत गंगेत क्रूझ सवारी आणि बाबा विश्वनाथचे घेतले दर्शन

Madhuri Dixit’s Spiritual Trip to Kashi: काशीत माधुरी दीक्षितची यात्रा, शिव तांडव गायन आणि बाबा विश्वनाथ दर्शन व्हायरल. गंगा क्रूझवर माधुरीचा भक्तिमय अनुभव.
Madhuri Dixit Viral

Madhuri Dixit Viral

esakal

Updated on

बॉलिवूडची 'धडकन' अभिनेत्री माधुरी दीक्षित सध्या तिच्या काशी यात्रेमुळे चर्चेत आहे. आपल्या सौंदर्याने आणि नृत्याने चाहत्यांना भुरळ घालणाऱ्या माधुरीने बनारसमध्ये चक्क 'शिव तांडव स्तोत्र' गाऊन सर्वांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला.

गेल्या दोन दिवसांपासून माधुरी दीक्षित तिचे पती डॉ. श्रीराम नेने यांच्यासोबत वाराणसीच्या दौऱ्यावर आहे. गुरुवारी एका शोरूमच्या उद्घाटनासाठी पोहोचलेल्या माधुरीने संपूर्ण वेळ बनारसी संस्कृतीचा आनंद लुटला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com