आजोबांच्या धाकाने शेणाने जमीन सारवायची माधुरी दीक्षित; मूळ कोकणातली आहे धकधक गर्ल, गावाचं नाव माहितीये?

MADHURI DIXIT VILLAGE NAME: बॉलिवूड गाजवणारी धकधक गर्ल माधुरी दीक्षित मूळची कोकणातली आहे. ती लहान असताना प्रत्येक उन्हाळ्यात गावाला जायची.
madhuri dixit villain

madhuri dixit villain

esakal

Updated on

अनेकदा कलाकार उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आजोळी जाताना दिसतात. गावाला जायचं म्हणजे एक हुरूप येतो. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री पूजा सावंत हिने ती गावी जात असल्याचं सांगितलं होतं. पूजा मूळची कोकणातली आहे. मात्र तुम्हाला माहितीये का बॉलिवूड गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री माधुरी दीक्षितदेखील कोकणातली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील पडेल हे गाव माधुरी दीक्षितचं आजोळ आहे. माधुरीचा जन्म मुंबईत झाला असला तरी ती प्रत्येक उन्हाळ्याच्या सुट्टी गावाला जायची. आपण आजोबांच्या धाकाने अगदी शेणाने जमीन सारवलीये असंही तिने सांगितलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com