

MADHURI DIXIT.
ESAKAL
बॉलिवूडची लाडकी धक धक गर्ल म्हणजेच अभिनेत्री माधुरी दीक्षित लवकरच सोनी मराठीच्या 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यासाठी ती अतिशय उत्सुक आहे. या विशेष भूमिकेसाठी तिने खास तयारी केली आहे. मात्र या शोच्या प्रोमोंमध्ये माधुरी पैठणी नेसून दिसतेय. सुरुवातीला हिरव्या पैठणीत दिसणारी माधुरी आता गुलाबी पठणीत दिसतेय. या शोसाठी तिने डिझायनर साडीऎवजी पैठणीची निवड का केली याबद्दल तिने एका मुलाखतीत सांगितलं आहे.