

MADHURI DIXIT
ESAKAL
बॉलिवूडची धक-धक गर्ल माधुरी दीक्षित आजही बॉलिवूडमध्ये कार्यरत आहे. तिने ८०-९०च्या दशकात तर प्रेक्षकांना वेड लावलं होतं. आज ५८ व्या वर्षीही माधुरी प्रचंड फिट आहे. तिच्या सौंदर्यावर आणि डान्सवर आजही चाहते फिदा आहेत. 'तेजाब' या चित्रपटाने तिला ओळख मिळवून दिली होती. तेव्हापासून माधुरी लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करतेय. माधुरीची 'मिसेस देशपांडे' ही सीरिज लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्यानिमित्ताने तिने तिच्या भारतात परत येण्याच्या निर्णयाबद्दल सांगितलं आहे.