MADHURI DIXIT TAKES SATARI STYLE UKHANA
esakal
MADHURI DIXIT FUNNY UKHANA VIRAL VIDEO FROM KON HONAR KARODPATI: सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित सध्या ‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम होस्ट करताना पाहायला मिळत आहे. या शोमध्ये ती तिच्या आणि डॉ. श्रीराम नेने यांच्याशी संबंधित अनेक किस्से, तसेच मुलांबद्दलच्या गोष्टीही सांगताना दिसते. या कार्यक्रमात आतापर्यंत प्रिया बेर्डे, रेणुका शहाणे आणि सोनाली बेंद्रे यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली असून, त्यांच्यासोबत माधुरीच्या खास गप्पाही रंगल्या होत्या. आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमातील कलाकारांची टीमदेखील ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर दाखल झाली होती. यावेळी कलाकारांची धमाल-मस्ती, भन्नाट विनोद आणि हास्याची मेजवानी पाहायला मिळाली. याचदरम्यान माधुरीने पती डॉ. श्रीराम नेने यांच्यासाठी खास सातारी शैलीत उखाणाही घेतला.