

madhuri dixit
esakal
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने आणि तिचे पती डॉ. श्रीराम नेने कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. मात्र सध्या माधुरी एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. अभिनेत्रीने तिचा जुहू येथील फ्लॅट विकला आहे. ज्यातून तिला दुप्पट नफा मिळालाय. यापूर्वीही अभिनेते अमिताभ बच्चन, अभिनेत्री काजोल यांनी जुहूमधला फ्लॅट विकला होता. आता माधुरीने विकलेल्या फ्लॅटमुळे पुन्हा एकदा जुहूमधील प्रॉपर्टीच्या किमती चर्चेत आहेत.