

amruta khanvilkar on nauvari saree
esakal
गेल्या वर्षभरात अनेक कलाकारांनी आपल्या नवीन बिझनेसचा पाया ठेवला. त्यात काहींनी हॉटेल व्यवसाय सुरू केला तर काहींनी स्वतःचे साड्यांचे ब्रँड सुरू केले. लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर हिनेंदखील तिचा नवीन बिझनेस सुरू केला. तिने 'अमूल्य बाय अमृता' हा साड्यांचा ब्रँड सुरू केला. यात ती पैठणी, बनारसी, प्युअर सिल्क साड्या विकते. आता तिच्या या ब्रँडची साडी चक्क अभिनेत्री माधुरी दीक्षित हिनेदेखील नेसली आहे. माधुरीने आपल्या ब्रँडची साडी नेसल्यावर अमृताचा आनंद गगनात मावेनासा झालाय. मात्र तुम्हाला या साडीची किंमत ठाऊक आहे का?