महाराष्ट्र दिवस: आरामाचा दिवस की आपल्या मातीशी असलेल्या नात्याची जाणीव?, शॉर्ट फिल्ममधून आशयघन विषय समोर

Maharashtra Divas New Short Film : महाराष्ट्र दिवस ही नवीन शॉर्ट फिल्म नुकतीच रिलीज करण्यात आली आहे. जाणून घेऊया या सिनेमाविषयी.
महाराष्ट्र दिवस: आरामाचा दिवस की आपल्या मातीशी असलेल्या नात्याची जाणीव?, शॉर्ट फिल्ममधून आशयघन विषय समोर
Updated on

Marathi Entertainment News : महाराष्ट्राच्या स्थापनेचा अभिमान जागवणारा महाराष्ट्र दिवस अनेकजण सुट्टीचा दिवस म्हणून साजरा करतात. मात्र या दिवसामागील इतिहास, संघर्ष आणि सांस्कृतिक ओळख नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने एक प्रभावी शॉर्ट फिल्म तयार करण्यात आली आहे. दिग्दर्शक सत्यजीत उल्हास भोसले दिग्दर्शित आणि सचिन तेली सहदिग्दर्शित 'महाराष्ट्र दिवस सुट्टीचा दिवस' या शॉर्ट फिल्मचं लाँच शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार श्री. आदित्य जी ठाकरे यांच्या हस्ते पार पडलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com