राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा संपन्न; आशा पारेख, अनुराधा पौडवाल, शिवाजी साटम यांसह नामवंतांचा गौरव

Maharashtra State Marathi Film Awards2024 : राज्याच्या १३ कोटी जनतेच्या वतीने देण्यात येणारे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
states film award
states film award esakal
Updated on

मराठी चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत महत्त्वाचा व मानाचा समजला जाणारा राज्य सरकारचा चित्रपट पुरस्कार सोहळा यंदा वरळीच्या डोम एसव्हीपी स्टेडियममध्ये २१ ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत राज्य चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आले.

यंदा राज्य सरकारतर्फे ५८ वा व ५९ वा राज्य चित्रपट पुरस्कार एकाच वेळी प्रदान करण्यात आले. या सोहळ्यात २०२३ मधील चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांना आणि स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना प्रदान करण्यात आले. तसेच, लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांना चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार व ज्येष्ठ लेखक-दिग्दर्शक एन. चंद्रा यांना स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार २०२४ प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल यांना प्रदान करण्यात आला. प्रख्यात अभिनेत्री रोहिणी हट्टगंडी यांना चित्रपटांसाठी राज्य सांस्कृतिक पुरस्कार २०२४ व प्रख्यात गायक सुदेश भोसले यांना कंठसंगीतासाठी सन्मानित करण्यात आले.राज्य सांस्कृतिक पुरस्कार २०२४ वितरणाचा हा सोहळा महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ आणि महासंस्कृती या संस्थांच्या सहकार्याने संपन्न झाला.

या पुरस्कार सोहळ्या दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अपर मुख्य सचिव , सांस्कृतिक कार्य विभाग विकास खारगे, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन करण्यात आले.

तसेच यावेळी पुढील पुरस्कारांचे वितरण करण्यात आले ५८ वे राज्य चित्रपट पुरस्कार खालीलप्रमाणे –

सर्वोत्कृष्ट कथा :- शंतनू रोडे ( गोष्ट एका पैठणीची ),

पटकथा :- मकरंद माने, विठ्ठल काळे (बापल्योक ),

उत्कृष्ट संवाद :- शंतनू रोडे ( गोष्ट एका पैठणीची )

उत्कृष्ट गीते :- गुरु ठाकूर, (बापल्योक)

उत्कृष्ट संगीत: – राहुल देशपांडे ( मी वसंतराव )

उत्कृष्ट पार्श्वसंगीत:- विजय गवंडे ( बापल्योक ),

उत्कृष्ट पार्श्वगायक:- राहुल देशपांडे ( मी वसंतराव )

उत्कृष्ट पार्श्वगायिका:- प्राची रेगे ( गोदाकाठ )

उत्कृष्ट नृत्यदिग्दर्शक :- सुजितकुमार (चोरीचा मामला )

उत्कृष्ट अभिनेता:- राहुल देशपांडे ( मी वसंतराव ).

उत्कृष्ट अभिनेत्री :- मृण्मयी गोडबोले ( गोदाकाठ )

उत्कृष्ट विनोदी अभिनेता :- जितेंद्र जोशी ( चोरीचा मामला )

सहाय्यक अभिनेता :- विठ्ठल काळे ( बापल्योक ),

सहाय्यक अभिनेत्री:- प्रेमा साखरदांडे ( फनरल),

प्रथम पदार्पण अभिनेता:- ऋतुराज वानखेडे ( जयंती),

उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री :- पल्लवी पालकर ( फास )

५९ वे राज्य चित्रपट पुरस्कार खालीलप्रमाणे –

सर्वोत्कृष्ट कथा :- मंगेश जोशी, अर्चना बोराडे ( कारखानिंसांची वारी),

उत्कृष्ट पटकथा :- रसिका आगासे ( तिचं शहर होणं ),

उत्कृष्ट संवाद :- नितीन नंदन ( बाल भारती )

उत्कृष्ट गीते:- जितेंद्र जोशी ( गोदावरी )

उत्कृष्ट संगीत: – अमित राज ( झिम्मा)

उत्कृष्ट पार्श्वसंगीत :- सारंग कुलकर्णी ( कारखानीसांची वारी),

उत्कृष्ट पार्श्वगायक :- राहुल देशपांडे ( गोदावरी ),

उत्कृष्ट पार्श्वगायिका :- आनंदी जोशी ( रंगिले फंटर),

उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक :- फुलवा खामकर ( लक डाऊन be positive )

उत्कृष्ट अभिनेता :-जितेंद्र जोशी ( गोदावरी,)

उत्कृष्ट अभिनेत्री :- सोनाली कुलकर्णी ( तिचं शहर होणं ),

उत्कृष्ट विनोदी अभिनेता :- भालचंद्र कदम ( पांडू )

सहाय्यक अभिनेता :- अमेय वाघ ( फ्रेम )

सहाय्यक अभिनेत्री :- हेमांगी कवी ( तिचं शहर होणं ),

उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता :- योगेश खिल्लारे ( इंटर नॅशनल फालमफोक )’

उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री :-श्रुती उबाले (भ्रमणध्वनी),

उत्कृष्ट विनोदी अभिनेत्री :- निर्मिती सावंत ( झिम्मा ).

states film award
Bigg Boss Marathi 5: सब गोलमाल है! जान्हवीने पॅडीची मागितलेली माफी स्क्रिप्टेड? बाहेरील परिस्थितीमुळे बिग बॉसने स्वतः दिले आदेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com