Namrata Sambherao: "महाराष्ट्राची लाडकी नमा..."; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरनं नम्रता संभेरावला लिहिलं खास पत्र

Namrata Sambherao: प्रसादनं नम्रताला खास पत्र लिहिलं आहे आणि खास गिफ्ट देखील दिलं आहे.
Namrata Sambherao
Namrata Sambheraoesakal

Namrata Sambherao: छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasya Jatra) या कार्यक्रमाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या कार्यक्रमातील कलाकारांच्या कॉमेडी अंदाज प्रेक्षकांची मनं जिंकतो. या कार्यक्रमातील अभिनेत्री नम्रता संभेराव (Namrata Sambherao) ही सध्या तिच्या नाच गं घुमा (Nach Ga Ghuma) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नम्रताना तिच्या या चित्रपटासाठी अनेक जण शुभेच्छा देत आहेत. अशातच आता अभिनेता प्रसाद खांडेकरनं (Prasad Khandekar) नम्रताला हटके पद्धतीनं शुभेच्छा दिल्या आहेत. प्रसादनं नम्रताला खास पत्र लिहिलं आहे आणि खास गिफ्ट देखील दिलं आहे.

नम्रतानं शेअर केला फोटो

प्रसाद खांडेकरनं नम्रताला खास पत्र लिहिलं. या पत्रामध्ये प्रसादनं लिहिलं, "महाराष्ट्राची लाडकी आणि टॅलेंटेड अभिनेत्री नमा". या पत्राचा फोटो नम्रतानं सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये प्रसादनं नम्रताला दिलेलं खास गिफ्ट देखील दिसत आहे. या फोटोला तिनं कॅप्शन दिलं, "सिनेमा रिलीज व्हायच्या एक दिवस आधी तू हे पत्र लिहिलंस तू नेहमीच प्रोत्साहन देत आलायस,सिनेमा सगळीकडे हाऊसफुल चाललाय, इतकं सूंदर surprise मेरा सच्चा दोस्त, This is so precious pashya, What a surprise, speechless, lovely creative gift, आणि पत्र लिहिलंस तू किती भारी रे पश्या"

Namrata Sambherao
Namrata Sambherao: "तुझ्या अनेक स्वप्नांपैकी एक स्वप्न..", प्रसादसाठी नम्रताची भावूक पोस्ट

'नाच गं घुमा' ची स्टार कास्ट

नाच गं घुमा या चित्रपटातील नम्रताच्या अभिनयाचं अनेकजण कौतुक करत आहेत. मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी यांनी नाच गं घुमा या सिनेमाचं लेखन केलंय तर परेश मोकाशी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन सुद्धा केलं आहे. नम्रता, मुक्ता बर्वेसोबत सारंग साठ्ये, सुकन्या कुलकर्णी, सुप्रिया पाठारे, शर्मिष्ठा राऊत, मधुगंधा कुलकर्णी, सुनील अभ्यंकर आणि बालकलाकार मायरा वायकुळ यांच्या मुख्य भूमिका आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com