

SANAI CHAUGHADE
ESAKAL
छोट्या पडद्यावर येत्या काही दिवसात काही नवीन मालिका सुरू होणार आहेत. त्यातली एक मालिका मालिका म्हणजे झी मराठीवरची 'सनई चौघडे' ही मालिका. या मालिकेत अनेक नवे चेहरे पाहायला मिळणार आहेत. तर 'प्रेमाची गोष्ट' फेम अभिनेता राज हंचनाळे या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. तर मेघना एरंडे आईच्या भूमिकेत दिसतेय. अशातच आता या मालिकेतील आणखी एका अभिनेत्याचा चेहरा समोर आलाय. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या मालिकेतील अभिनेतादेखील मालिकेत महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.