MARATHI ACTRESS ISHA DE SHARES PRE-WEDDING RITUAL PHOTOS
esakal
ISHA DE’S WEDDING BUZZ: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा लोकप्रिय कार्यक्रम घराघरात पोहचला आहे. या शोमध्ये प्रत्येक कलाकार प्रेक्षकांचा आवडता आहे. प्रत्येकांची विनोदाची शैली वेगवेगळी आहे. त्यामुळे हा शो प्रेक्षकांच्या आवडता आहे. दरम्यान अशातच या कार्यक्रमातील एका कलाकाराची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगताना पहायला मिळतेय. महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम इशा डे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. तिने तिच्या लग्नाच्या पहिल्या विधीचे फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलेत.