Gulkand New Marathi Movie esakal
Premier
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'नंतर निर्मात्यांनी केली नव्या सिनेमाची घोषणा ! 'या' कलाकारांच्या मुख्य भूमिका
Gulkand Upcoming Marathi Movie : महाराष्ट्राची हास्यजत्रा या सिनेमाचे निर्माते आणि दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी नवीन मराठी सिनेमाची घोषणा केली.
Marathi Entertainment News : महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम सध्या सगळीकडे चांगलाच गाजतोय. सगळ्यात जास्त टीआरपी असलेल्या या कार्यक्रमाचे श्रेय या कार्यक्रमातील सगळ्या कलाकारांबरोबरच या सिनेमाचे दिग्दर्शक आणि निर्मात्यांनाही दिलं जातं. या कार्यक्रमाच्या गाजलेल्या जोडीने म्हणजेच सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांनी नव्या सिनेमाची घोषणा नुकतीच केली. 'गुलकंद' असं त्यांच्या आगामी सिनेमाचं नाव असून लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

