

rohit mane on rutuja bagwe hotel
ESAKAL
गेल्या वर्षभरात अनेक मराठी कलाकारांनी अभिनयासोबतच त्यांच्या स्वतःच्या हिमतीवर वेगळा व्यवसाय सुरू करण्यावर भर दिलाय. काहींनी स्वतःचे कपड्याचे ब्रॅण्ड सुरू केले. काहींनी दागिन्यांचा व्यवसाय सुरू केला तर काहींनी स्वतःचं रेस्टॉरंट सुरू केलं. त्यातलीच एक अभिनेत्री म्हणजे ऋतुजा बागवे. ऋतुजाने स्वतःचं रेस्टॉरंट सुरू केलं. अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे ऋतुजा बागवे. तिने काही महिन्यांपूर्वीच नवीन व्यवसाय सुरू करत आपलं 'फूडचं पाऊल' हे रेस्टॉरंट सुरू केलं. आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधील अभिनेता रोहित माने यानेदेखील तिच्या रेस्टॉरंटमध्ये हजेरी लावली. त्याने तिथे काय खाल्लं आणि चवीबद्दल काय म्हणाला ते पाहूया.