MAHERCHI SAADI SHOOTING PUNE
Esakal
MAHERCHI SAADI FAMOUS HOUSE SHOOTING LOCATION IN PUNE: मराठी सिनेसृष्टीतील असे काही सिनेमे आहेत जे आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. त्या सिनेमाची कथा, पात्र,लोकेशन्स प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. १९९१ मध्ये माहेरची साडी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा सिनेमा त्याकाळी प्रचंड गाजला. सिनेमातील भावनिक कथा, कलाकार आणि मोठा वाडा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. दरम्यान या सिनेमात दाखवण्यात आलेलं आलिशान घर पुण्यातील एका ऐतिहासिक वास्तू असल्याचं सांगितलं जातं.