

mahesh manjrekar
esakal
लोकप्रिय दिग्दर्शक, अभिनेते आणि निर्माते महेश मांजरेकर यांच्या 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन मांजरेकरांनी केलंय. पहिल्या दिवशी या चित्रपटाने २० लाखांची कमाई केलीये. या चित्रपटाच्या निमित्ताने मांजरेकरांनी शार्पनर वर्ल्डला दिलेल्या मुलाखतीत त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नांची मांजरेकरांनी उत्तरं दिलीयेत. यातील पहिला प्रश्न होता आज छत्रपती शिवाजी महाराज कुठे असतील? या प्रश्नाचं उत्तर देत महेश मांजरेकर म्हणाले,"कुठे असतील माहिती नाही. पण ते जिथे असतील ना त्या जागेला स्वर्ग म्हणत असतील. जिथे महाराज तिथे स्वर्ग".