

mahesh manjrekar on satya manjrekar
esakal
आपल्या अभिनयाने आणि दिग्दर्शनाने प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे लोकप्रिय दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचं इंडस्ट्रीत वेगळं वजन आहे. त्यांचे चित्रपट थिएटर गाजवतात. मात्र त्यांचा मुलगा सत्या मांजरेकर याला या क्षेत्रात यश मिळालं नाही. सत्याने लहानपणी एका सिनेमात काम केलेलं मात्र या या क्षेत्रात आपलं काहीही भविष्य नाही याची जाणीव झाली आणि सत्याने हॉटेल व्यवसायात नशीब आजमावायचं ठरवलं. सत्याने गोरेगाव येथे 'सुका सुखी' हे हॉटेल सुरू केलंय. या हॉटेलचं उत्तम सुरू असतानाच आता त्याने आणखी एक व्हेंचर सुरू केलंय. त्याने ‘House fit wah ‘ नावाने इंटेरिअरचा व्यवसाय सुरू केलाय. अशातच सत्याच्या त्या आजारपणाबद्दल चर्चा रंगलीये ज्याबद्दल महेश यांनी मुलाखतीत सांगितलेलं.