
लव फिल्मसने हिंदीमध्ये उत्तमोत्तम चित्रपट दिलेले आहेत. हिंदीमधील एक प्रख्यात बॅनर म्हणून त्याची ख्याती आहे. आता हेच बॅनर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये उत्तमोत्तम आणि दर्जेदार चित्रपट बनविण्याच्या उद्देशाने उतरले आहे. या बॅनरचा पहिलावहिला मराठी चित्रपट 'देवमाणूस' आता प्रदर्शित झाला आहे. उत्तम कथाबीज आणि त्याची योग्य अशी बांधणी, तेजस प्रभा विजय देऊसकरचे नेटके व कल्पक दिग्दर्शन, नेहा शितोळने बांधलेली भक्कम पटकथा, कलाकारांचा सहजसुंदर अभिनय अशा काही बाबी या चित्रपटाच्या जमेच्या आहेत. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणारा... शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा असा भावनाप्रधान चित्रपट आहे.