
Marathi Entertainment News : मराठी बरोबरच बॉलिवूडमध्येही नाव कमावणारे दिग्दर्शक अभिनेते म्हणजे महेश मांजरेकर. महेश यांचा अभिनय असो किंवा दिग्दर्शक त्यांच्या सिनेमांचा एक स्पेशल चाहतावर्ग आहे. महेश यांच्या मुलांनीही काही वर्षांपूर्वी सिनेमात पदार्पण केलं. त्यांची मुलगी सई सिनेइंडस्ट्रीत यशस्वी ठरली असली तरीही मुलगा सत्यावर बरीच टीका झाली. त्यामुळे त्याने सिनेविश्वातून माघार घेतली. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी सत्याविषयी सांगितलं.