
punha shivajiraje bhosle movie teaser release
esakal
महाराष्ट्र फक्त महाराजांनाच ऐकतो आई म्हणूनच महाराष्ट्राला पुन्हा शिवरायांची गरज आहे असं म्हणत लोकप्रिय मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' या चित्रपटाची घोषणा केली होती. २००९ साली प्रदर्शित झालेल्या 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' या चित्रपटाने प्रेक्षकांची वाहवा मिळवली होती. या चित्रपटाने मराठी माणसाची मेलेली अस्मिता जागवली होती. या चित्रपटाने प्रेक्षकांना मराठी अस्मितेशी पुन्हा ओळख करून दिली होती. मराठी माणसाचा स्वाभिमान पुन्हा जागृत केला होता. आता पुन्हा एकदा तशीच सणसणीत चपराक मराठी माणसाला बसणार आहे. मांजरेकरांच्या 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय.