

mahesh tilekar on ashwini bhave
esakal
कलाकार पडद्यावर जसे दिसतात ते तसेच असतात असं गरजेचं नाही. कधी कधी कलाकारांना आपल्या कामाचा आणि प्रसिद्धीचा देखील गर्व होतो. लोकप्रिय मराठी दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी त्यांच्या कामाने इंडस्ट्रीमध्ये वेगळी ओळख निर्माण केली. त्यांचा 'मराठी तारका' हा कार्यक्रम प्रचंड गाजला होता. यात त्यांनी अनेक अभिनेत्रींना सोबत आणण्याचा रेकॉर्ड केला. आता महेश यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री अश्विनी भावे यांच्या वागण्याबद्दल सांगितलंय जेव्हा त्यांनी एका कार्यक्रमात त्यांना साधी ओळखही दाखवली नव्हती.