Maidan Movie Review: भारतीय फुटबाॅल संघाचे सोनेरी पान

अमित शर्मा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्यांनी भारतीय फुटबाॅल संघाच्या उदयाची आणि सुवर्ण काळाची कथा या चित्रपटामध्ये मांडलेली आहे.| Amit Sharma has directed this movie. He has presented the story of the rise and golden era of Indian football team in this film.
Maidan Movie
Maidan Moviesakal

हिंदी चित्रपट- मैदान (hindi moive maidan)

संतोष भिंगार्डे

Maidan Murder Movie: सध्या अजय देवगणचे एकापाठोपाठ एक चित्रपट प्रदर्शित होत आहेत. नुकताच त्याचा शैतान हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आता त्यापाठोपाठ मैदान हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीम यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटामध्ये अभिनेता अजय देवगणने सय्यद अब्दुल रहीम यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. हा एक स्पोर्टस ड्रामा असून अमित शर्मा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्यांनी भारतीय फुटबाॅल संघाच्या उदयाची आणि सुवर्ण काळाची कथा या चित्रपटामध्ये मांडलेली आहे.(indian football team history)

Maidan Movie
August Kranti Maidan:'..तरी काहींच्या पोटात दुखतंय'; आझाद मैदानातून फडणवीसांची टीका

ही कथा १९५० ते १९६२ या कालखंडातील आहे. भारतीय फुटबाॅल टीमला जगाच्या नकाशावर वेगळी ओळख निर्माण करण्याचे सय्यद रहीम यांचे ध्येय असते. त्या दृष्टीने ते प्रयत्न करीत असतात.

१९५२ च्या हेलसिंकी आॅलिंपिकमध्ये भारताला युगोस्लाव्हियाविरुद्ध १-१० असा मानहानीकारक पराभव पत्करावा लागला होता.(1952 Helsinki Olympics)

त्यामुळे सय्यद रहीम फुटबाॅल असोसिएशनमधील सदस्यांचा विरोध डावलून एक नवीन फुटबाॅल टीम तयार करतात. देशाच्या कानाकोपऱ्यांतून ते नवोदित तरुणांना त्या टीममध्ये सामील करून घेतात. त्यांच्या संघात चुनी गोस्वामी, पी. के. बॅनर्जी, पीटर थंगराज, जर्नेल सिंग, प्रद्युत बर्मन यांसारखे आश्वासक आणि दमदार खेळाडू असतात.(Syed Rahim Football)

Maidan Movie
Maidan Ajay Devgan: 'भोला' रिलीज झाल्यावर अजय देवगण 'मैदान' गाजवणार, आगामी सिनेमाची शानदार घोषणा

त्यांच्यावर ते कमालीचे मेहनत घेत असतात. १९६० मधील रोम येथील स्पर्धेत त्यांचा संघ उत्तम कामगिरी करतो. परंतु पदक न मिळाल्यामुळे विरोधकांचा सामना त्यांना करावा लागतो. क्रीडा पत्रकार (गजराज राव) यांच्या राजनीतीचा फटका रहीम यांना बसतो. परिणामी त्यांना प्रशिक्षकपदावरून हटविले जाते.

त्याच दरम्यान रहीम यांना फुफ्फुसाचा कर्करोग असल्याचे निदान होते. त्यांची पत्नी सायरा (प्रिया मणी) तसेच त्यांचा मुलगा व मुलगी आणि आई यांना मोठा धक्का बसतो. अशाही परिस्थितीमध्ये रहीम यांना त्यांची पत्नी पुन्हा प्रशिक्षक होण्यास प्रोत्साहन देते. त्यानंतर मोठ्या धीराने आणि ध्येयाने रहीम पुन्हा प्रशिक्षक पदावर येतात. त्यांच्या येण्यामुळे सगळे खेळाडू कमालीचे खुश आणि आनंदित होतात. त्यानंतर अनेक अडथळ्यांवर मात करीत रहीमची फुटबाॅल टीम १९६२ मधील आशियाई क्रीडा स्पर्धेत आपल्या देशाला सुवर्णपदक मिळवून देते.

साहजिकच भारताची मान अभिमानाने उंचावते. दिग्दर्शक अमित शर्मा यांनी या चित्रपटाची मांडणी करताना अगदी बारीकसारीक गोष्टींचा विचार केला आहे. फुटबाॅलमधील रणनीती तसेच त्यातील तंत्र तसेच त्या खेळातील एकूणच राजनीती या बाबी दिग्दर्शक अमित शर्मा यांनी पडद्यावर छान टिपल्या आहेत.(Maidan Movie Review)

Maidan Movie
Badaun Double Murder Case: चिमुकल्यांची हत्या करणाऱ्या नराधमाचा भाऊ अटकेत; म्हणाला, 'ज्यांच्या मुलांची हत्या झाली त्यांच्याशी चांगले संबंध...'

अभिनेता अजय देवगणने प्रशिक्षकाची भूमिका समरसून साकारली आहे. अतिशय संयमी आणि शांत स्वभावाची त्याची ही व्यक्तिरेखा आहे. आपले ध्येय निश्चित केले आणि त्याकरिता कठोर मेहनत घेतली की यश मिळते हे सांगणारी आहे.

प्रिया मणी, गजराज राव, चैतन्य शर्मा,देविंदर गिल,अमर्त्य रे,सुशांत वेदांदे,मननदीप सिंह,अमान मुंशी,तेजस रविशंकर आदी कलाकारांनी आपापली कामगिरी चोख बजावली आहे. गजराजची नकारात्मक भूमिका लक्षात राहणारी अशीच आहे. विशेष बाब म्हणजे चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी उत्तम झाली आहे.

त्याबद्दल तुषार कांती रे आणि फ्योदोर लिआस यांचे कौतुक करावेच लागेल. ए. आर. रेहमान यांनी सुंदर असे संगीत दिले आहे. तरीही चित्रपटाची लांबी खटकणारी बाब आहे. तसेच चित्रपटाचा पूर्वार्ध संथ झाला आहे. कथानक विकसित करण्यात दिग्दर्शकाने खूप वेळ घेतला आहे. त्यामुळे चित्रपटाची लांबी वाढलेली आहे. मात्र मध्यांतरानंतर चित्रपट चांगलीच मनाची पकड घेतो. जिद्द, चिकाटी आणि मेहनत यांच्या जोरावर भारतीय फुटबाॅल संघ सुवर्ण पदक जिंकतो.

चार स्टार

Maidan Movie
Badaun Double Murder Case: ना आजारी, ना गरोदर.. साजिदनं पत्नीच्या आजारपणाचं दिलं खोटं कारण अन् निष्पाप मुलांचा घेतला बळी, का रचला कट?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com