
makadvchale
esakal
बालप्रेक्षकांना मनसोक्त आनंद देण्याकरिता एक आगळेवेगळे आणि थरारक बालनाट्य लवकरच रंगभूमीवर दाखल होत आहे – ते म्हणजे उत्क्रांती घडवणारे बालनाट्य 'माकडचाळे'. प्रशांत निगडे लिखित व दिग्दर्शित हे बालनाट्य केवळ विनोद आणि धमाल नाही, तर ते मुलांना निसर्गाशी जोडून, एक नवा आणि चित्तथरारक अनुभव देण्यास सज्ज झाले आहे. माझे पूर्वज, माझे सुपर हिरो! हे प्रभावी घोषवाक्य घेऊन येणारे हे नाट्य, आजकाल मोबाईलमध्ये हरवून जाणाऱ्या मुलांची कथा सांगते. सहलीला गेलेली काही मुले घनदाट जंगलात हरवतात. तिथे त्यांची एका माकडाशी झालेली मैत्री आणि त्यानंतर जंगलात त्यांनी केलेली धमाल, हे सर्व पाहणे प्रेक्षकांसाठी एक रोमांचकारी अनुभव ठरणार आहे.