
छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित 'छावा' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. अभिनेता विकी कौशल याने या चित्रपटात महाराजांची भूमिका साकारली आहे. १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने केवळ ८ दिवसात ३०० चा आकडा पार केला. अशात मराठमोळे अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी हा चित्रपट सहकुटुंब पाहिला. आणि आता त्यांनी चित्रपटावर प्रतिक्रिया दिली आहे.