

MALLIKA SHERAWAT ON MURDER MOVIE BOLD SCENES
ESAKAL
बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी सध्या त्याच्या 'आवारापन २' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय. मात्र आजही इमरानला ज्या चित्रपटामुळे ओळखलं जातं तो चित्रपट म्हणजे 'मर्डर'. यातील त्याची आणि अभिनेत्री मल्लिका शेरावतची केमिस्ट्री चांगलीच गाजलेली. त्यांचे किसिंग सीन्स चांगलेच व्हायरल झालेले. इतर बोल्ड सीन्सची देखील चर्चा झालेली. या चित्रपटातील गाणीही चांगलीच गाजली. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री मल्लिका शेरावत हिने त्या सीन्सवर भाष्य केलंय.