

Entertainment News : फ्रेंडशिप डेच्या आठवड्यात मैत्री, धमाल आणि नॉस्टॅलजियाची मसालेदार ट्रीट घेऊन येणाऱ्या ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ या चित्रपटाचं धमाकेदार टायटल साँग प्रदर्शित झालं आहे. ‘मामाच्या गावाला जाऊया’ या बडबडगीताच्या चालीवर ठेका धरायला लावणारं हे गीतही तुम्हाला नॉस्टॅलजिक करणारं आहे. शब्दांनीच तुम्हाला गोव्याच्या माहोलची सफर घडवणाऱ्या या गाण्याचे गीतकार, संगीतकार आणि गायकही अवधूत गुप्ते आहेत. त्यांच्या युथफुल एनर्जिटीक आवाजाने आणि संगीताने त्यांनी या गाण्याला अल्टिमेट पार्टी आणि मस्ती साँगचा बाज दिला आहे.