MAMTA KULKARNI VIRAL VIDEO
Esakal
MAMTA KULKARNI GANPATI AARTI VIDEO GETS FUNNY NETIZENS REACTIONS: ९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री ममता कुलकर्णी गेल्या काही काळापासून अध्यात्मिक प्रवासामुळे चर्चेत आहेत. महाकुंभमेळ्यात संन्यास घेतल्यानंतर त्या साध्वीच्या वेशात अनेक धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होताना दिसल्या. 'श्री यमाई ममता नंदगिरी' हे नाव त्यांनी धारण केलं. संन्यास घेतल्यानंतर ममता कुलकर्णी सोशल मीडियावरही अध्यात्म आणि भक्तीशी संबंधित पोस्ट तसेच व्हिडिओ शेअर करताना दिसतात. आता त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.