
मराठी चित्रपटसृष्टीत नाविन्यपूर्ण कथानक आणि दमदार मांडणीमुळे प्रेक्षकांची उत्सुकता कायम असते. अशातच, सुप्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे आणि मानसी नाईक यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘सकाळ तर होऊ द्या’ या आगामी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला मध्यप्रदेशातील इंदूर आणि परिसरात सुरुवात झाली आहे.