
Bollywood Entertainment News : बॉलिवूडमधील दिवंगत दिग्गज अभिनेते मनोज कुमार यांचं काल 4 एप्रिलला निधन झालं. मृत्यूसमयी त्यांचं वय 87 होतं. त्यांनी अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं. त्यांचे अनेक सिनेमे हे देशभक्तीपर होते. आज 5 एप्रिलला त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यापूर्वी त्यांचं पार्थिव शरीर त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं.