

TEJPAL WAGH
ESAKAL
महाराष्ट्रात लवकरच निवडणुकीची धामधूम सुरूहोणार आहे. नुकतंच नगरपालिकांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलंय. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने राज्यात नगरपरिषदा आणि नगर पंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. २ डिसेंबरला मतदान आणि ३ तारखेला मतमोजणी होणार आहे. यासगळ्यात एक मराठी अभिनेतादेखील निवडणूक लढवणार असल्याचं दिसतंय. नगरपालिका निवडणुकीत तो उभा राहणार असल्याची चर्चा आहे. हा अभिनेता मूळचा वाईचा आहे आणि तो वाईकरांना त्याच्या पोस्टच्या माध्यमातून साद घालत आहे असं दिसतंय.