

marathi actor house fire
esakal
काही दिवसांपूर्वीच मराठी अभिनेता शिव ठाकरे याच्या मुंबईतील घराला आग लागली होती. आता त्याच्या पाठोपाठ आणखी एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या घराला आग लागली आहे. त्याचा व्हिडिओ समोर आला असून नेटकऱ्यांनी त्याच्या घराबद्दल हळहळ व्यक्त केलीये. हा अभिनेता आहे पुष्कर जोग. पुष्करच्या मुंबईतील फ्लॅटला आग लागल्याची घटना घडली. मात्र वेळेत मदत पोहोचल्याने त्याच्या कुटुंबियांना यात दुखापत झालेली नाही. त्याचं कुटुंब सुखरूप आहे. मात्र आपलं घर जळाल्याचं सांगत त्याने दुःख व्यक्त केलंय.