

ANUSHKA PIMPUTKAR AND MEGHAN JADHAV WEDDING
ESAKAL
Meghan Jadhav Wedding: मराठी इंडस्ट्रीमध्ये लग्नसराई पुन्हा एकदा सुरू झालीये. 'लक्ष्मीनिवास' मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला लोकप्रिय अभिनेता जयंत म्हणजेच मेघन जाधव यानेही त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री अनुष्का पिंपुटकर हिच्याशी लग्नगाठ बांधली. त्यांचा लग्नसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. अनुष्का सध्या 'लग्नानंतर होईलच प्रेम' या मालिकेत दिसतेय. त्यांचा लग्नातला लूकदेखील चाहत्यांच्या पासनाटीस उतरला. मात्र या सगळ्यात आणखी एका व्यक्तीची सोशल मीडियावर चर्चा रंगली. ती व्यक्ती म्हणजे मेघनची वहिनी. नवरीच्या लुकपेक्षा जास्त तिच्या जाऊबाईच्या लूकची चर्चा होताना दिसतेय.