कसलं भारी! मराठमोळ्या अभिनेत्याने दादरमध्ये सुरू केलं हॉटेल; मिळणार अस्सल मालवणी पदार्थ; नाव तर एकदम युनिक

MARATHI ACTOR NEW HOTEL IN DADAR: आणखी एका मराठी अभिनेत्याने दादरमध्ये स्वतःचं हॉटेल सुरू केलंय. त्याने आपल्या हॉटेलचं नावदेखील अगदी हटके ठेवलंय.
marathi actor new hotel

marathi actor new hotel

esakal

Updated on

छोट्या आणि मोठ्या पडद्यावरील अनेक कलाकार सध्या स्वतःचं काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. अनेक कलाकारांनी यापूर्वी स्वतःचा बिझनेस सुरू केलाय. कुणी नेल आर्ट तर कुणी दागिन्यांचा बिझनेस. अनेक कलाकारांनी यापूर्वी स्वतःचं हॉटेल सुरू केलंय. आता या यादीत आणखी एका अभिनेत्याचं नाव जोडलं गेलंय. यापूर्वी ऋतुजा बागवे, श्रेया बुगडे यांनी स्वतःचं हॉटेल सुरू केलंय. आता त्यात मराठमोळा अभिनेता समीर खांडेकर यानेही स्वतःचं हॉटेल सुरू केलंय. नुकतंच या हॉटेलचं उदघाटन झालंय. त्याने त्याच्या हॉटेलचं नावही इतकं युनिक ठेवलंय की प्रत्येकजण त्याचं कौतुक करतोय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com