

santosh juvekar on chhaava trolling
esakal
गेल्या वर्षी ब्लॉकबस्टर ठरलेल्या काही चित्रपटांपैकी एक म्हणजे विकी कौशल याचा 'छावा' चित्रपट. यात विकीने स्वराज्याचे धाकले धनी स्वराज्यरक्षक संभाजी महाराजांची भूमिका साकारली होती. या भूमिकेला आणि चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. चित्रपटात अनेक मराठी कलाकार होते. त्यातलाच एक संतोष जुवेकर. मात्र संतोषने चित्रपट प्रदर्शनानंतर अभिनेता अक्षय खन्नाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे त्याला ट्रोल करण्यात आलेलं. अभिनेता अक्षय खन्नाने या सिनेमात औरंगजेबाची भूमिका साकारली होती. त्यामुळे संतोष 'मी त्याच्याकडे बघूच शकलो नाही' असं अक्षय खन्नाबद्दल म्हणाला होता. आता त्या ट्रोलिंगवर अभिनेत्याने प्रतिक्रिया दिली आहे.