

sayaji shinde vanrai fire
ESAKAL
Sayaji Shinde Vanrai Fire: लोकप्रिय मराठी अभिनेते सयाजी शिंदे यांनी मराठी रंगभूमीची जितकी सेवा केली तितकीच सेवा या देशाची देखील केली. आपल्या अभिनयाने, नाकात्मक भूमिका साकारत समोरच्याच्या मनात भीती बसवणारे, प्रेक्षकांच्या शिव्या खाणारे सयाजी शिंदे यांनी आपल्या समाजकार्याने मात्र सगळ्यांची मनं जिंकली. त्यांनी प्रचंड मेहनत करत संपूर्ण महाराष्ट्र हिरवागार करण्याचा निश्चय केला. याच निश्चयाचा भाग म्हणून महाराष्ट्रातील बीड येथे सयाजी यांनी सह्याद्री देवराई उभी केली. हजारो झाडं लावत त्यांनी ओसाड परिसर हिरवागार केला. मात्र आता हा परिसर जळून खाक झालाय. या आगीत अनेक झाडं आणि वन्यप्राणी जळालेत.