SAYAJI SHINDE SON
esakal
SAYAJI SHINDE AND SON TO STAR TOGETHER IN VISHNUBALA: मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे अभिनेते सयाजी शिंदे यांचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना पहायला मिळतात. दरम्यान आता वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत मुलगा सिद्धार्थ सयाजी शिंदे लवकरच रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे. विशेष म्हणजे, ‘विष्णूबाळा’ या आगामी मराठी चित्रपटातून सिद्धार्थला वडिलांसोबत काम करण्याची संधी मिळणार आहे. बाप लेकाच्या जोडीला एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.