

मराठी चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिनेता संकेत कोर्लेकर याला ठाण्यात एक धक्कादायक अनुभव आलाय. त्याचा नवीन घेतलेला महागडा फोन चोरटयांनी हिसकावून नेलाय. रिक्षामधून प्रवास करताना दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी त्याचा मोबाईल खेचल्याचा प्रकार घडलाय. या घटनेनंतर त्याने पोस्ट करत त्याचा अनुभव शेअर केलाय. हे ठाण्यात घडेल असं वाटलं नव्हतं असं तो पोस्टमध्ये लिहिलंय.