
गणेशोत्सवाच्या उत्साहात नामवंत कलाकार विविध मंडळांना भेट देत आहेत.
जोगेश्वरीतील सुप्रसिद्ध शामनगरचा राजा मंडळात दोन आगामी मराठी चित्रपटांच्या टीमने दर्शन घेतले.
‘आतली बातमी फुटली’ आणि ‘दशावतार’ या चित्रपटांच्या कलाकारांचे मंडळाने शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले.