
मराठीसोबतच बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुख याच्या 'राजा शिवाजी या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड चर्चा होती. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. २ वर्षांपूर्वी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. आता नुकतीच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे. रितेशने नुकताच या चित्रपटाचा मोशन पोस्टर रिलीज केलाय. यात रितेश छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसतोय. स्वराज्याचा भगवा फडफडतोय. या पोस्टरसोबतच त्याने चित्रपटात काम करणाऱ्या कलाकारांची नावंदेखील शेअर केली आहे.