
SMITA SHEWALE
ESAKAL
बॉलिवूडसोबतच आता अनेक मराठी कलाकार आपल्या पार्टनरपासून वेगळे राहत आहेत. गेल्या महिन्याभरात दोन कलाकारांनी घटस्फोटाची घोषणा केली. त्यात अभिनेत्रींचाही समावेश होता.आता अशाच एका अभिनेत्रीने एकट्याने मुलाला संभाळण्याबद्दल वक्तव्य केलं आहे. ही अभिनेत्री आहे छोटा आणि मोठा पडदा गाजवणारी स्मिता शेवाळे. स्मिता तिच्या 'आभास हा' या गाण्यासाठी आजही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. स्मिताने २०१३ रोजी निर्माता राहुल ओडकशी लग्नगाठ बांधली होती. मात्र लग्नाच्या १२ वर्षानंतरत्यांनी घटस्फोट घेतला. सध्या स्मिता तिचा मुलगा कबीर याचं एकट्याने पालनपोषण करतेय. याबद्दल ती सकाळला दिलेल्या मुलाखतीत बोलली आहे.