

isha keskar
esakal
काही महिन्यांपूर्वी 'लक्ष्मीच्या पावलांनी' ही मालिका बंद झाली. मात्र ही मालिका बंद होण्यापूर्वी यातील मुख्य नायिका ईशा केसकर हिने मालिका सोडली होती. त्यामुळे तो मुद्दा चांगलाच गाजला होता. तिचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. त्यामुळे तिच्या मालिकेला टीआरपीमध्ये स्थान मिळतंच. यापूर्वी तिच्या 'जय मल्हार' मधील बानू असुदे किंवा 'माझ्या नवऱ्याची बायको'मधील शनाया असो. तिच्या पात्रांची कायमच चर्चा होते. मात्र खऱ्या आयुष्यात ईशाने स्वतःची काही तत्व आणि नियम ठेवले आहेत. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत ईशाने तिचे विचार स्पष्टपणे सांगितले आहेत.